पूर्व जन्मीचे भक्त, तपी, कपी आणि गोपीं ना ईश्वर प्रेरणा देतील
महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेली मलिकेची एक दुर्मिळ ओळ…
“शेष कली लीला भवतु आगे बुझाई कहिबे
सर्वलो जाइफूलो कल्कि रूप धरिबे माधब।“
अर्थात –
कलियुगाच्या शेवटी, भगवान महाविष्णू स्वरूप चक्रधर श्री माधव महा प्रभू हे स्वतः भगवान कल्कीं चे रूप धारण करतील. परंतु, मायेच्या प्रभावाने प्रत्येकजण त्यांना ओळखू शकणार नाही.
प्रत्येक युगात, जे भक्त परमेश्वराच्या दिव्या लीलां मध्ये त्यांना सदैव साथ देतात व धर्म संस्थापने दरम्यान त्यांना सहाय्य करतात ( जसे कि तपी म्हणजे ऋषी मुनी, कपी म्हणजे वानर आणि गोपी म्हणजे गोप गोपाळ म्हणून ओळखले जातात ), त्यांनाच भगवंताचा अवतार ओळखण्याची कृपा प्राप्त होईल.
जय जगन्नाथ