भगवान कल्किचे नाव संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणे
महापुरुष अच्युतानंद दास जी यांनी लिहिलेल्या मलिकाच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-
“तुम्भ सेवा काहू जाणीवी प्रभु जगोजी बन, प्रकुति माने भुलाइले सुधारस आप्यानो, राखिले रख जगन्नाथे नाही अन्य रखंता, तुम्भे ना रखिले भासिली प्रभु सुणि नाहुओचिंता।“
अर्थात –
भक्त देवाला म्हणतात कि हे प्रभू आपली सेवा करण्याची क्षमता आमच्या मध्ये नाही. आपली सेवा करण्यात स्वतः ब्रम्हाजी आणि महादेव देखील असमर्थ ठरले आहेत. या ब्रह्मांडातील सर्व देवतागन जरी एकत्रित झाले तरी ते देखील आपली सेवा करण्यात असमर्थ आहेत.
आदी काळात जेव्हा आपण आपले पद्यपद्मा स्वर्गलोक आदी ग्रहण हेतू स्थिर केले होते त्या वेळी सर्व ब्राम्हणड चिरून आपले अभय पद्यपद्मा ब्रह्मलोका पर्यंत पोहचले होते. आपली हि अद्भुत लीला पाहून ब्रम्हाजीनी प्रभू श्री हरीची आपली स्तुती केली होती आणि आपली अंतर इच्छेला आपल्या संमुख प्रकट केले होते हे दीनबंधू जर आपली आज्ञा असेल तर आपण ब्रह्मलोकात यावे. मी आपल्या श्री चरणांना एकदा जरी धरू शकलो तरी माझे संपूर्ण जीवन सार्थक होईल. नंतर प्रभूंची आज्ञा स्वीकार करून ब्रम्हाजीनी आपल्या कमंडलू मध्ये स्तिथ असणाऱ्या माता गंगे द्वारे जल अभिषेक करण्याची चेष्ठा केली परंतु माता गंगा देखील प्रभूंचे चरण धुण्यास असमर्थ ठरली. प्रभू श्री हरीच्या चूर्णाच्या छोट्या बोटाच्या कोपऱ्यात पोहचताच माता गंगा अंतरधान (विलुप्त) झाल्या.
ब्रम्हाजी द्वारा श्री चरणांचे अभिषेक या घटनेच्या वेळी भगवान शंकरांनीही ब्रह्माजींचे पाय धुतल्यावर चरणामृत प्यायची इच्छा व्यक्त केली होती. गंगाजी द्वारा अभिषेक न होऊ शकल्या मुळे ब्रह्माजी किंवा महादेव यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. स्वतः ब्रह्मा किंवा महादेव सुद्धा महाविराट त्रिभुवनपतीची सेवा करू शकले नाहीत अशा भगवान भयहरी मधुसूदन भगवानांची सेवा भक्त तरी काय करू शकणार?
महापुरुष अच्युतानंद जी पुन्हा या विषयावर अशा प्रकारे लिहितात…
“तुम्भ सेवा कहूँ जाणीवी तुम्भ वृतयंक सेवा, सेवार सिमानो जाणोई उड़ी वईलियोवा।“
अर्थात –
आम्ही आपली सेवा करण्यास असमर्थ आहोत. आपले शरीर अनंतकोटी विश्वब्रम्हांडात व्याप्त आहे. आम्ही पामरांचे असे चांगले कर्म देखील नाहीत, ना आम्ही केवट, विदुरजी आणि माता कुब्जा प्रमाणे भाग्यवान नाही कि आम्ही आपले चरण धु शकतो. आता प्रयन्त केवळ त्रेतायुगात केवट आणि द्वापारयुगातील विदुरजी आणि माता कुब्जा यांनाच आता पर्यन्त श्री हरीचें पादपद्मा अभिषेकाचे सौभाग्य प्राप्त झाले आहेत.
वर्तमान काळात कलियुगात भक्तांसाठी कोणतीही सेवा नाही. केवळ दीन दुखी, जीवजंतूंना, काहीतरी दान करावे. निरंतर प्रभू श्रीहरीचे नाम संकीर्तन करावे, सत्संग करावा आणि आपल्या सान्निध्यात जे सज्जन येथील त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. भगवान कल्की नावाचा प्रचार-प्रसार संपूर्ण विश्वात करावा. प्रभू कोणापासून काहीच अपेक्षा करीत नाहीत नाही प्रभूंना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार, ना प्रभूंनी रामावतार व कृष्ण अवतारात कोणापासून ही काही घेतले नव्हते नाही वर्तमान अवतारात काही घेतील.
भक्तांचे भक्तीभाव समर्पण आणि नाम प्रचार व दान या व्यतिरिक्त प्रभुंना देण्या खातिर काहीच उरत देखील नाही. भयंकर पाऊस पडेल, आकाशातून उल्कापात होईल, एक एक गाव, शहर, वन जळून खाक होईल, समुद्र आपले सीमा उल्लंघन करेल, जलप्रलयाचे तांडव करेल, समुद्रातून मोठे मोठे वादळ येतील आणि भूखंडावर विनाश होईल. भुकंपा द्वारा देखील विनाश होईल, रोग, महामारी, भूकमारी सांप्रदायिक हिंसा अविश्वास आणि पती-पत्नींमध्ये कलह उत्पन्न होईल. वर्तमान काळात पती-पत्नी स्वार्थी आणि कामवासणा सक्त असतील हे सर्व भविष्यकाळातील विनाशाचे संकेत आहेत
“जय जगन्नाथ”