सोळा मंडळातील सर्व आठ हजार भक्त यज्ञात सहभागी होतील.
महापुरुष अच्यतानंद दास जीं नी लिहिलेल्या मलिकेतील काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
“सियालदहरे पाती रेल पिन्धीन लोहार सरंखल
रहिची सही बंदी घरे मुक्ति लागिबे जग्य स्थले।“
अर्थात –
भारता विरुद्ध तेरा मुस्लिम देशांच्या होण्याऱ्या युद्धाच्या सुरुवातीला पश्चिम बंगाल राज्यातील सियालदह येथे महायज्ञ केला जाईल. त्यावेळी भगवान कल्की यांनी स्थापित केलेल्या सोळा मंडळातील सर्व आठ हजार भक्त महायज्ञात सहभागी होऊन यज्ञ पूर्ण करतील. त्याच वेळी एक अद्भुत घटना घडेल. सियालदह येथे ब्रिटीश राजवटीत बनवलेले पितळयाचे रेल्वे इंजिन तेथील संग्रहालयात साखळदंडा ने बांधून ठेवलेले आहे आहे. ते इंजिन भगवान कल्कीच्या इच्छेने, स्वयं ती साखळी तोडून जगन्नाथजींना इंजिन ड्रायव्हर शिवाय जगन्नाथ पुरीला आणेल. सियालदह येथे जो महायज्ञ होत असेल त्याच यज्ञ समयी ते पितळी इंजिन साखळ दंडातून मुक्त होणार आहे.
महापुरुष पुन्हा लिहितात…
“भक्तंकर कुरिबे कातर स्मरिबे कल्कि मनन्तर तेनुकर सेही समय समस्त भक्त।“
अर्थात –
त्यावेळी सर्व सोळा मंडळांतील आठ हजार भक्त सियालदह येथील यज्ञस्थळी भगवान कल्की नामाचा नामजप करत पूर्ण भक्तिभावाने प्रभुंना शरण जातील.
सियालदह यज्ञाच्या वेळी श्रीक्षेत्रावर यवनांच्या आक्रमणावर महापुरुष जी लिहितात…
“बहिव तहि रक्त धारा खेत्रे कंपिबे चक्रधर,
संघार करता सदाशिव श्रीखेत्रे मिलिथिब आगो,
सेस्थाने तुम्भे गुप्तेथिब मोहि तेहि हेबि अविर्भाब,
एहि समय पाती रेल श्रीखेत्रे मिलिबे चंचल।“
अर्थात –
सियालदहच्या महायज्ञानंतर श्रीक्षेत्र (जगन्नाथ मंदिर) वर विदेशी शत्रू सैन्याचा हल्ला होईल. श्रीक्षेत्रात भयंकर रक्तपात होईल. अगणित लोकं मारली जातील. युद्धाच्या आवाजाने जगन्नाथजींचे श्रीक्षेत्र प्रचंड हादरेल. त्याचवेळी भगवान शिव आणि माँ भवानी यांना जगन्नाथ पुरी मंदिरावर शत्रूंनी केलेल्या हल्ल्याची माहिती होईल आणि ध्यानस्थ बसलेल्या उमापती महादेवांना, श्री जगन्नाथ क्षेत्रात भयंकर संकट आल्याचे समजल्याने ते स्वयं कैलास स्थान सोडून जगन्नाथ पुरीला अवतीर्ण होतील.
त्याचवेळी भगवान कल्की देखील श्रीक्षेत्रावर प्रकट होतील. त्या भयंकर युद्ध समयी यवन सैन्य मंदिरात प्रवेश करेल. भारतीय सैन्य यवन सैन्याशी हातघाईच्या लढाईत गुंतले असतानाच, भगवान कल्कि आणि सदाशिव अवतीर्ण होतील आणि जगन्नाथ मंदिराचे रक्षण करतील. ह्याच वेळी ते साखळदंड मुक्त पितळी इंजिन जगन्नाथजींना सुरक्षित स्थानांतरित करण्यासाठी सियालदहहून जगन्नाथ पुरीला ड्रायव्हर विरहित येईल.
सियालदह ते जगन्नाथ पुरी पर्यंत रेल्वे लाईन नव्हती. पण भगवान जगन्नाथ जीं च्या कृपेने गेल्या काही वर्षात सियालदह ते पुरी पर्यंत एक रेल्वे लाईन देखील बांधली गेली आहे. ते पितळी इंजिन जगन्नाथ पुरीला ईश्वरी इच्छेने थांबेल.
मंदिरे पसिबे झसाई पंडानकु हाणी देबे सेई।
अर्थात –
प्रचंड मुस्लिम सैन्य जगन्नाथ मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नांत असताना त्यांचे भगवान जगन्नाथांच्या सेवकां बरोबर तुंबळ लढाई होईल व त्यातअति जीवित हानी होईल. सात दिवसांच्या अथक युद्धा नंतर भारतीय सैन्य यवनांना मारून जगन्नाथ मंदिर मुक्त करेल.
देउले नीति बंद हेबो बिमला आखि तराटीब।
अर्थात –
भगवान जगन्नाथ पुरीमध्ये साठियेपोथीचे पदार्थ खातात, म्हणजेच पुरी श्रीक्षेत्राव्यतिरिक्त सर्व मंदिरांमध्ये भगवानांना कोरडे अन्न मिळते. फक्त जगन्नाथ पुरीमध्येच भगवान साठियेपोथी जेवणाचा आस्वाद घेतात.
जगन्नाथजी रोज प्रयागमध्ये स्नान करतात असे भविष्य मलिकेत वर्णन आहे. भगवान बद्रीधाममध्ये शृंगार करतात. जगन्नाथ पुरीमध्ये नैवेद्य घेतात आणि त्यानंतर संपूर्ण विश्वाची स्थिती पाहण्यासाठी भगवान गुप्त ठिकाणी जातात. त्यानंतर भगवान द्वारकाधीश येथे जाऊन विसावतात. त्यानंतर रात्री भगवान वृंदावनात गोपींसोबत रोज रात्री रासलीला करतात. जगाच्या स्वामीचा हा नित्यक्रम आहे.
जेव्हा पितळी इंजिन जगन्नाथ पुरीला पोहोचेल, तेव्हा भगवान जगन्नाथाची पूजा अर्चना थांबेल. तेव्हा पुरीमध्ये माता बिमला (दुर्गा) जी जगन्नाथ मंदिरात प्रमुख देवता आहे व तिची पूजाही जगन्नाथजींच्या बरोबरीने केली जाते. ती माँ बिमला स्वतः शांतपणे सर्व घटना पाहत असेल आणि तिला समजेल की भगवंतांच्या ह्या सर्व लीला धर्म संस्थापने साठी होत आहेत. जगत्पतींच्या धर्माच्या स्थापनेची हीच वेळ आहे. ह्याच समयी भगवान श्रीक्षेत्र सोडून छतिया वट स्थानी प्रयाण करतील.
“गरुड़ आदि बिराजेते चाहिँना थिबे आज्ञामात्रे,
दखिण द्वारे हनुवीर मोडुमथिब भुजतार,
बोधिबे तार चक्रधर मर्त्यबैकुंठ हुए सार।“
अर्थात –
ह्या युद्ध समयी विष्णू भक्त गरुड आणि इतर सर्व वीर युद्धासाठी भगवंतांच्या आदेशाची वाट पाहत असतील आणि भगवंतांची आज्ञा मिळताच क्षणात संपूर्ण यवन सैन्याच्या संहारा ची योजना करत असतील. परंतु प्रभूंच्या आज्ञे शिवाय त्यांच्यात क्षमता असूनही ते संहार करणार नाहीत. जगन्नाथ मंदिरातील दक्षिण दरवाजावर हनुमानजी (बेड़ी हनुमान) विद्यमान आहेत. ते अति विक्राळ रूप धारण करून भयंकर गर्जना करत दक्षिण दरवाज्यातून प्रकट होतील .
प्रभूंच्या आदेशाची वाट पाहणाऱ्या वीर गणांना , तेव्हा महाप्रभू जगन्नाथ म्हणतील की “ वीर हो, या कलियुगात मी ह्या स्थानी दारुब्रह्माच्या अवतारात आहे तसेच मी बुद्ध रूपातही आहे. म्हणूनच मी इथे सगळं बघेन पण काही बोलणार नाही. कारण येथे नश्वर स्वर्ग आहे, म्हणून मला येथे लढायचे नाही. माझ्या शरीरातून मी कल्की म्हणून जन्म घेतला आहे आणि आता फक्त कल्की युद्ध करतील. म्हणून हे हनुमाना, हे गरुडा आपण सर्वजण थांबावे कारण हे युद्धाचे स्थान नाही “.
“जय जगन्नाथ“