कलियुग समाप्ती कालगणना संदर्भ   "जथा चंद्र तथा तिस्य ब्रहस्पतिस्य बृहस्पति एक रासो मनुष्यन्तितदा भवितत कृतं।"   अर्थात श्रीमद्भागवतात  सत्य युगाच्या आगमनाची पूर्वसूचना म्हणून पुष्य नक्षत्रात होणाऱ्या चंद्र, सूर्य आणि गुरु यांच्या दृष्टी व युती बद्दल स्पष्ट उल्लेख केलेला आहे. असाच एक योग १९४३ साली ऑगस्ट महिन्यातील एका रविवारी आला होता आणि त्याच वर्षी अष्टग्रहकूट (ऑक्टो प्लॅनेटरी) हा योग देखील होता. याचा पुरावा ब्रह्मदेवाचा पुत्र मनू याने स्वतः लिहिलेल्या चतुर्युग  गणनेच्या ग्रंथात स्पष्टपणे आढळतो.   "चतुर्यहु सहस्त्राणि बरसाणं तत युगम कृतं   तस्य पावक्छती संध्या संध्या सस्चथा बुधः"   अर्थात ४४०० वर्षांनी संधिकाल सुरू होईल याचा अर्थ शास्त्रा नुसार युग गणनेत युगां मधील  सतांश ( संधी काल ) चा भाग भोगावा लागतो तो भाग पण  युग गणनेत समाविष्ट आहे. म्हणजेच कलियुगातील ४४०० वर्ष आणि पुढील संधी काळाची ४०० वर्ष अशी एकूण ४८०० वर्षा नंतर कलियुग संपेल. ओरिसाच्या जगन्नाथ पंजिका ग्रंथा नुसार सध्या कलियुगाचे ५१२४ वर्षे चालू आहेत.  तसेच  दक्षिण भारतातील पंजिका नुसार सध्या कलियुगाचे ५१२२ चालू आहे.  त्यामुळे ह्या गणने नुसार कलियुग केव्हाच संपुष्टात आले आहे. सांप्रत समयी, ओरिसाच्या पवित्र भूमीवर भगवान कल्की सनातन धर्म संस्थापने साठी साक्षात अवतरले आहेत आणि त्यांचे हे कार्यही अविरत चालू आहे. ह्याच बरोबर नजीकच्या भविष्यात मनुष्य समाज भयानक विनाश अनुभवतील. जय जगन्नाथ