माता भद्रकाली कडून दुराचारी वैष्णवांचा होणारा संहार   महापुरुष श्री अच्युतानंद दास यांनी वैष्णव जनांसाठी  लिहिलेल्या भविष्य मलिका मधील काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-   चोराईण नाबेले श्रीवृन्दावनरे प्रभुंक संगरे दलु ,दाम सुदाम सुबल श्रीभछ पंचसखा संगेतिलु।    अर्थात-  महान पुरुष श्री अच्युतानंद म्हणतात की द्वापारयुगात आम्ही सर्व पंचसखा (दाम, सुदाम, सुबल, सुबाहु, सुबच्छा) भगवान श्रीकृष्णांसोबत गायी चरण्यासाठी वृंदावनात गेलो होतो.   महापुरुष श्री अच्युतानंद द्वापरयुगातील वृंदावन येथे घडलेल्या एका घटनेबद्दल लिहितात ...   दिवस अवस हुअन्ते प्रबेस उत्तरा बाहूड़ा बेले गोपी गोपाल गोबच्छा सहिते सदने आसिबा बेले। ताहदेखिक आदिपूर्ण शसी सकती प्रकासी लह-लह जीवा कले, गोपाल पुअंकु देखी जोग माया भखीवा मोने कल्पिले।   अर्थात-  आम्ही पंचसखा, भगवान श्रीकृष्ण आणि गोप, गोपाळ, गौ माता असे सर्व सूर्यास्ताच्या वेळी घरी परतत होतो. त्याच वेळी माता काली (योगमाया) हिने गोप गोपालांना पाहिले तेव्हा त्यांचे शुद्ध आणि सुंदर शरीरं पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांना खाऊन टाकण्याची इच्छा व्यक्त करत माता कालीने आपले उग्र रूप धारण केले. त्या वेळी, भगवान कृष्ण काली देवीला म्हणाले, हे माते तुला काय हवे आहे ?   तेव्हा माता महाकाली प्रभुंना म्हणाली... बिसुद्धो सोरीर ओटे हंकर मोमन लोभ होईला, रक्त मांस सुद्धअटे अहंकु भखीबा मोने कल्पिबा।   अर्थात-  हे प्रभू, हे सगळे गोप-गोपाळ सखा शुद्ध आणि पवित्र आहेत. यास्तव, माझ्या मनात त्यांना खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मी काय करावे ?   हे ऐकून भगवान श्रीकृष्ण माता कालीला उत्तर देतात...    भवानी रगिर सुणि चक्रधर श्रीमुखरु आज्ञा देले सुध सोणित रक्तमाँस भखीबा कहिदेवा वाभोले मोर भकत मोहर सेचित्त मोरअंग अटन्ति ताकू तुम्भेवा जदिचभकिब अम्भे काहेमु वसंती।   अर्थात-  भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माते , हे सर्व माझे सहकारी, सोबती आणि मित्र आहेत. ते सर्व माझे अविभाज्य अंग आहेत. त्यांच्यासाठीच मी पृथ्वीवर अवतरलो आहे. मला ह्या वृंदावनात या सोळा हजार गोप गोपालां सोबत अनेक लीला करायच्या आहेत. यास्तव तुझी ही इच्छा मी ह्या काळी पूर्ण करू शकणार नाही.   माता काली पुन्हा प्रभूंकडे आपली इच्छा व्यक्त करते...   कपट ना करी प्रभु नरहरि पेड़ीक इवच्छामूरे केहुँसे जुगरे केहुँसमयरे आगहो कुहोपथरे।  अर्थात-  माता काली प्रभुंना विचारते कि कृपया आपण मला सांगावे कि कोणत्या वेळी माझी असे शुद्ध व पवित्र मांस खाण्याची तीव्र इच्छा पूर्ण होईल ?   मग जगत्पती, भगवान कमलनयन माता महाकालीला म्हणतात...   धन्य कलीजुगे अबतारो लेबी नदिया नवद्वीपरे सखा संगी तुम्भे समस्ते जन्मिबे भक्ति हेबजे प्रकासो।    अर्थात-  भगवान म्हणतात, जेव्हा मी घोर कलियुगात नवद्वीपावर चैतन्य नावाने अवतार घेईन, त्याचवेळी तुला खावेसे वाटणारे माझे भक्तहि माझ्याबरोबर जन्म घेतील. माझे देश-विदेशातील ते सर्व भक्त धर्मप्रसाराच्या माध्यमातून तेव्हा वैष्णव धर्मात सामील होतील.   प्रभु पुन्हा म्हणतात...   आम्भे वेनिभाई भकतंकु घेयनी देश-विदेश घमिबु भकतंकु भेंट करी जेउचाट पासंड जनमोड़ीबू।   अर्थात-  प्रभु म्हणतात की मी चैतन्य अवतारात नवद्वीपामध्ये प्रेम आणि धर्माचा प्रचार करीन आणि जगातील सर्व भक्त माझ्यामध्ये सामील होतील. माझ्या ह्या अवतार समाप्ती नंतर, काही काळाने, कलियुगाच्या शेवटी, मी कल्की अवतारात येईन आणि देश-विदेशात, म्हणजे संपूर्ण जगात संचार करेन. त्यावेळी माझे निस्सीम भक्त माझ्या पाठीशी असतील. त्यावेळी सत्य आणि धर्म संस्थापनेच्या कार्यात मी पापी, आसुरी व भ्रष्ट लोकांचा वध करेन. अशा प्रकारे माता भद्रकालीस द्वापारयुगात भगवान कमलनयन श्री कृष्णांनी पवित्र मांस खाण्याची इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते...    थोके मूढोजने भकत जनमे बैष्णब धर्म करिबे महिमा बुझिबे मंत्रजे सिखिबे सर्व विषय जाणीबे।   अर्थात-  कलियुगाच्या शेवटी, जेव्हा मी कल्किअवतारात येईन, तेव्हा माझे भक्तही जन्म घेतील. ते सर्व भक्त त्यावेळी माझा महिमा सांगतील. माझे सर्व भक्त पवित्रतेने पवित्र स्नान, नाम जप इत्यादी नियमांचे पालन तर करतील पण यासोबतच एकीकडे ते पाप कर्मेहि करत राहतील. हे माते, द्वापारयुगात माझ्या भक्तांना भक्ष्य करण्याच्या तुझ्या इच्छेनुसार कलियुगात त्यांच्या वधाचे काम मी तुझ्या हाती देईन.   थूके मद भक्ष्य करिण से मुख्य नागान्तो पथरे थिबे छटको नाटको करिण उच्चाटो अकर्म करी करिबे सुद्ध सोणित माँसोटे ताहांकर कारणों लोभिबे नाही तुम्भे माहामाई आसा रखीथिब तेतिकी बेलू कुचाहिँ।    अर्थात-  भगवान श्री कृष्ण काली मातेला सांगतात की " जे भक्त वैष्णव धर्माचे पालन करीत असताना, एकीकडे मात्र मांस खातील , असे ते सर्व भक्त कलियुगाच्या शेवटी तुझ्या साठी शुद्ध आणि पवित्र भक्ष्य असतील. ते सत्ययुगातही जाणार नाहीत. तू त्यांचे मांस भक्षण करून तुझी द्वापार युगातील इच्छा पूर्ण झालेली असेल.   मंत्र-जंत्र बुझी नवधा भकती है जिसे करुण थिबे माछ माँसो सुखुआ पखाल खाई द्वादस चिता काटिबे।   अर्थात-  मलिकेच्या या ओळी वैष्णव धर्माच्या सर्व भक्तांसाठी लागू नाहीत. ह्या ओळी त्या लोकांसाठी आहेत जे वैष्णव धर्मात राहून तंत्र विद्या, अघोर उपासना , नव विधा भक्ती करत राहतील पण त्याच वेळी मासे, मांस आणि अंडी असे तत्सम अभक्ष्य पदार्थ पण खातील आणि एकीकडे चंदन टीळा लावत श्री कृष्णांची आराधना हि करतील.   "जय जगन्नाथ"