चतुर्युग गणनेबाबत विचार   ब्रह्मांड तत्वानुसार जगात अनुक्रमे चार उपभोगांची युगे आहेत. त्या चार युगांची नावे आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापर युग आणि  कलियुग             सत्ययुगाची आयु (भोग काळ) 17,68,000 वर्षे आहे. या युगात धर्माविषयी सांगितलेल्या चार पग (गुण) आहेत - सत्य, शौच (आतील आणि बाहेरील स्वच्छता), दया आणि क्षमा. या चार पग (गुण) असणाऱ्या धर्मामुळे सत्ययुगात प्रत्येकजण आनंदात, सुखासमाधानाने जीवन जगत होते आणि मानवी समाजात सुख, शांती, समृद्धी, स्थिरता हे प्रत्येकाच्या आयुष्यात होते.              सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. या युगाचे आयु (भोग काळ) 12,96,000 वर्षे आहे. या युगात धर्म तीन पग (गुणांसोबत) विराजमान असते. त्यात मुख्यतः सत्य, दया आणि क्षमा. या युगात एक पग (गुण) धर्म क्षय झाले ते म्हणजे “शौच(स्वच्छता / पवित्रता).               युग चक्रानुसार तिसरे म्हणजेच द्वापर युग येते. या युगाचे वय 8,64,000 वर्षे आहे. या युगात धर्माच्या फक्त दोन पग (गुण) दिसून येतात , ते म्हणजेच सत्य आणि क्षमा.            या सर्व युगांनंतर येणारा चौथा आणि शेवटचा युग म्हणजेच कलियुग आहे. या युगाचे वय 4,32,000 वर्षे आहे. या युगात तीन पग (गुण) धर्माची हानी झाली आणि एकच पग (गुण) धर्म राहिले आणि ते म्हणजे सत्य.  वैवस्वत मनू आपल्या मनुस्मृती शास्त्रात याचे प्रमाण देतात कि कलियुगाच्या अंतिम समयी धर्म केवळ दानाच्या माध्यमातून आपली अंतिम अवस्थेत टिकून राहील. परंतु महापुरुष पंचसखांनी भविष्यमालिकेत कलियुगाची आयु आणि मनुस्मृती मध्ये लिहले गेलेली स्तिथी आणि काळ यांचे संशोधन करून श्री हरी प्रभूंच्या आज्ञेनुसार युगव्यवस्थेचे विस्तृत भाव पुढील श्लोकात वर्णन केले आहे- 
"धर्म चारिपाद निश्चय कटिब हरि आश्रा कर नर, सुकर्म कुकर्म बिचारी पारिले पाद पद्मे स्थान पाई"
अर्थात-  महापुरुष अच्युतानंद दासजी लिहितात कि कलियुगाच्या अंतिम समयी धर्माचे चारही पग समाप्त होतील आणि त्याच्या सोबत पृथ्वी वर मोठ्या आपदांचा-विपतींचा सामना करावा लागेल आणि पृथ्वी वर दुष्काळ पडेल. महापुरुष या युगाला "संगमयुग/युगसंध्या" या नावाने संबोधतात. अच्युतानंद दासजी सर्वाना चेतावणी देत लिहितात ‘हरी नाम स्मरण, भजन कीर्तन आणि भविष्य मालिकेचा आधार घेत वैदिक धारेचे पालन करणारा मनुष्यच सत्युगात प्रवेश करण्यास पात्र ठरणार आहे.’
"चत्त्वार्य्जाहु सहस्राणि बर्षाणां तत्क्रृतम् युगम्, तस्य ताबछ्छती संध्या संध्यांशश्च तथाबिधः"
मनुस्मृतीच्या वरील श्लोकाचा अर्थ असा आहे - चार हजार वर्षांनी सत्युगाचे आगमन होते. त्या चार हजार वर्षांची परमायू  त्यांची सुरूवात व अंत ची  संधी  कालावधी  एकूण परमायूच्या दशमांश वर्ष असतो. म्हणजेच-  कलियुगाचे वय = 4000 वर्षे कलियुगाचा आरंभ आणि द्वापार युग अंत यांच्या दोन संध्या- = 400X2 = 800 वर्षे एकूण 4,800 वर्षे कलियुगातील उपभोगाचा काळ आहे.
"चत्त्वार्य्जाद सहश्राणि चत्त्वार्य्जाद शतानिचम्, कलेर्ज्यदा गमिस्यंति तदापूर्वम् युगाश्रितम्।" (निर्णय सिंधू)
निर्णय सिंधु ग्रंथातील वरील श्लोकात स्पष्टरूपात म्हटले गेले आहे कि 4,000 वर्षांव्यतिरिक्त कलियुगाच्या सुरूवातीचा संधीकाळ 400 वर्ष आणि कलियुगाच्या शेवट झाल्यावर नवीन युग सुरू होण्याआधीचा संधीकाळ 400 वर्ष मिळून कलियुगाचा 4,800 वर्ष भोगकाळ असेल.
"अदाश्वत्वः सहश्राणि कलै चतुः शतानिचम्, गते गिरि बरेहि श्री नाथ प्रादुर्भविष्यतिं।" (गर्ग संहिता)
गर्गसंहिते मधील वरील श्लोकाचा भावार्थ असा कि- कलियुगाच्या 4००० वर्ष भोगकाळ नंतर संधीकाळ च्या  4०० वर्षानंतर भगवान महाविष्णू पृथ्वी वर कल्कि अवतार धारण करतील आणि पृथ्वीवरील पापांचा भार कमी करतील. वरील नमुद केलेल्या  शास्त्र मनुस्मृती, निर्णय सिंधु आणि गर्ग संहितेत लिहीलेल्या तथ्यानूसार  कलियुगाची आयु 4000 वर्षे आहे. त्याचा एक दशमांश संधीकाळ 400 वर्ष आहे आणि कलियुगाच्या सुरवातीचा संधीकाळ 400 वर्ष भोग झाला आहे. अर्थात 4000+400+400=4,800 वर्ष मात्र कलियुगाचा भोग काळ असेल.  मनुस्मृती, निर्णय सिंधु आणि गर्गा संहिता शास्त्रानुसार कलियुगाला  4,800 वर्षांचा उपभोग असावा. परंतु या सर्व धर्मग्रंथांच्या निर्मितीला हजारो वर्षे उलटून गेल्यावर या कलियुगात सुमारे 6०० वर्षांपूर्वी पंचसखा महापुरुषांनी भविष्य मालिका ग्रंथाची रचना केली. आणि निर्गुण- निराकार प्रभूंच्या मार्गदर्शनानुसार, पंचसखांनी त्यांच्या मालिका ग्रंथातील जुन्या शास्त्राच्या वर्णनात किंचित बदल करून, 200 वर्षे 4,800 वर्षात जोडून, ​​कलियुगाचे वय 5,000 वर्षे भोगाचे वर्णन केले.
"चारि लक्ष जे बतिश सहस्त्र, कलियुग अटइ आयुष पाप भारा रे कलि तुटिजिब, पांच सस्र कलि भोग होइब।।" (भक्त चेतावनी- अच्युतानंद)
महापुरुष अच्युतानंद दासजी,निर्गुण- निराकार प्रभूंच्या आज्ञेनुसार आपल्या "भक्त चेतावणी"या ग्रंथात प्रमाण देतात कि कलियुगाचा संपुर्ण भोग काळ 4,32,000 वर्ष असेल परंतु पापाच्या भारामुळे युग क्षय होऊन कलियुगाला फक्त 5000 वर्ष  भोग होईल.  
"ठिकणा अमर पुर, ठाकुर तहीं रु हेबे बाहार, रामचन्द्र रे, ठारि पांच सहस्र कु धर, रामचन्द्र रे (भबिष्यत चउतिसा, अच्युतानंद)
महापुरुष अच्युतानंद जी आपल्या 'भविष्यत् चउतिसा ' या ग्रंथात प्रमाण देतात की, कलियुगाचा भोगकाळ 5००० वर्ष इतका असेल. वरील श्लोक पंक्ती मध्ये अच्युतानंद जी स्पष्टपणे लिहितात कि नीलांचाल धाम आदी वैकुंठ धाम श्री जगन्नाथ धाम पुरी  येथूनच श्री जगन्नाथ जी मनुष्य रूपात कल्की अवतार धारण करतील आणि त्याच वेळी कलियुगाचा 5००० वर्ष भोग झालेला असेल. अर्थात 5००० वर्षाचा कलियुग भोग काळ संपेल तेव्हा महाप्रभु जगन्नाथ जी मनुष्यरूपात कल्की अवतार घेतील.
"ठिकणा अच्युत कले, '' तिनी बामे पांच रखिले रामचन्द्र हे। ठकि जिब मिन शनी भले रामचन्द्र हे।।" (भविष्यत मालिका, अच्युतानंद)
पुन्हा महा पुरुष अच्युतानंद जी त्यांच्या 'भविष्यत मालिका' या ग्रंथात लिहितात की, 'ठ' (ओडिया भाषेत '0') तीन वेळा लिहून त्याच्या डाव्या बाजूला पाच (5) लिहिले ज्याचा अर्थ असा होतो की कलियुगाचा 5,000 वर्ष भोग काळ पूर्ण झाल्यावर, जेव्हा शनि  मीन राशीत प्रवेश करतील (वर्ष 2025 मध्ये  शनीचे राशी परिवर्तन होईल) त्या वेळी मनुष्य समाजाला भयानक आपत्तीचा-विपदांचा, अति संकटांचा सामना करावा लागेल आणि त्याचवेळी भक्तगण भविष्यमालिका ग्रंथांचे अनुसरण करतील, त्यानुसार वागतील. 
"एबे पांच ठिक कहिबा शुण, बारंग बिचारे चित्त रे घेन। पांच सहस्र जेतेबेले हेब, संपूर्ण लीला प्रकाश होइब" (महागुप्त पद्मकल्प- शिशु अनंत दास)
पंचसखांपैकी एक सखा महापुरुष श्री शिशु अनंत दासजी महाराज आपल्या 'महागुप्त पद्मकल्प' या ग्रंथात कलियुगा संबंधी  लिहितात की, कलियुगा च्या 5,००० वर्ष भोग काळा नंतर भक्तांना प्रभूंची लीला प्रत्यक्षपणे सत्य रूपात पाहण्याचे भाग्य मिळेल.
"बारंग बोलइ शुणिमा गोसाईं कुह भविष्य बिचार, केतेबेले कल्कि अवतार हेबे शुणईं मुखु तुंम्भर। शिशु बोलंति हे शुणिमा बारंग कलंकी स्वरूप होइ, युग संधि पांच सहस्र बरष जेबे जिब भोग होइ। जेसनेक निशि पाहिले प्रभात युग संधि एहा जांच, सेमंत समये कलंकी स्वरूप हेबे प्रभु नारायण। समक्षरा बता शुणि आदिकरि प्रमाण एहाकु कर, सबु एक ठाबे मिशाइ कहिण करिबु पांच हजार। एहि समय कु लये करिथिबु कहिलि हे बाबु तोते, ठिकरे कथा देखाइ कहिलु रखिथिबु हृद गते" (आगत भविष्यत- शिशु अनंत)
पुन्हा महापुरुष श्री शिशु अनंत दासजी महाराज आपल्या 'आगत भविष्यत' या ग्रंथात आपल्या शिष्य बारंगच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतात की, कलियुगाच्या संधीकाळच्या वेळी, म्हणजेच संगमयुगात भगवान नारायण कल्किच्या रूपात अवतार घेतील, आणि त्याच वेळी कलियुगचे 5,000 वर्षे भोग काळ संपलेले असेल.
"संबश्चर पांच सहस्र कलि होइब शेष, सत्य युग आद्य होइब शुभ जोगे प्रकाश। साधु संत माने बसिबे सभा आरंभ करि, सेहि समस्त न्कु पुजिबे पटुआर आबोरि। हरि शबद रे मातिबे हरि भकत माने, हरष होइबे हृद रे दुःखी दरिद्र माने। फिटिब प्रजा न्क कषण कष्ट होइब नाश, क्षमे हाडि दास भणिले आगत जे भविष्य।" (कलि चउतिसा- हाडि दास)
पंचसखांच्या निर्वाणा नंतर (देह प्रस्थान नंतर), ओडीसाच्या छतीया बटचे महंत तथा दिव्यद्रष्टा  महापुरुष हाडीदास जी महाराज जे महापुरुष श्री अच्युतानंद जी यांचा नववा अवतार म्हणून ओळखले जातात व मालिका मध्ये ही त्याबद्दल अनेक प्रमाण आढळतात ते महापुरुष हाडीदास जी आपल्या दिव्यदृष्टीने आपला ग्रंथ 'कली चौतिसा' मध्ये भक्तांच्या कल्याणासाठी आणि मानवी समाजाला सावध करण्यासाठी, लिहितात की 5,000 वर्षांत कलियुगाचा भोग काळ समाप्त होईलआणि त्यानंतर संध्यायुगाचा म्हणजेच आदि सत्ययुगाचा प्रकाश सर्वत्र पसरेल. त्याच वेळी भगवान कल्की धर्तीवर मानव रूप घेऊन धरावतारण करून समाजाला पापाच्या भारातून मुक्त करतील आणि पृथ्वीवर सत्य, शांती, दया , क्षमा, मैत्री आणि धर्माची संस्थापना करतील. त्यावेळी भगवान कल्कि सुधर्मा महा-महासंघ स्थापित करतील. संपूर्ण विश्वात सुधर्म महा-महासंघ आणि सनातन धर्माचा भक्तांच्या माध्यमातून  प्रचार करतील. साधू-संत गाव, ग्राम, नगर, देश आणि समस्त विश्वात सनातन धर्माचा प्रचार करतील. भगवान कल्की साधू-संतांचे कष्ट दूर करतील आणि दुष्टांचा विनाश होईल. भक्तांसाठी शुभ आणि आनंदाचे दिवस येतील, आणि सर्वात महत्वाचे संपूर्ण विश्वात सत्याचा प्रकाश पसरेल.
"निश्व अवतार अबनी ऊपर निलांबर पुर बास, निश्चे पांच सस्र भोग र अंतेण होइथिबु जे नरेश" (उद्धव भक्ति प्रदायिनी- अच्युतानंद)
महापुरुष अच्युतानंद दास जी यांच्या "उद्धव भक्ती प्रदायिनी " या ग्रंथात श्री कृष्ण आणि उद्धव जीं मध्ये जो संवाद झाला त्यात उद्धवाच्या प्रश्नाचे उत्तर देताना श्री कृष्ण म्हणतात कि ‘कलियुगाचे 5000 वर्ष भोग काळ संपल्यावर मी (महाविष्णू जी) आपल्या नीलांचाल धामाचा त्याग करून मानवरूपात कल्कि अवतार धारण करेन’.
"चहटिब लीला तु चारि रे मिशा एक, चढा तिनि शुन तहिं जेते हेला ठीक। चलिजिब घोर कलि दलिदेबे मिलि, चेताइण गीते कहे अच्युत जे भालि।" (भविष्यत मालिका- अच्युतानंद)
पुन्हा महापुरुष अच्युतानंद जी त्यांच्या 'भविष्यत मालिका' या ग्रंथात म्हणतात की, कलियुगाच्या पाच हजार वर्षांच्या उपभोगानंतर भगवान कल्की अवतरतील आणि लीला करतील.
"कलियुग पांच सहस्र गले, बिष्णु जे जनम होइबे भले। पांच सहस्र रे नर शरीरे, बिष्णु जे राजुति करिबे भले" (पट्टा मडाण- शिशु अनंत)
महापुरुष शिशु अनंत जी महाराज आपल्या मालिका ग्रंथ “पट्टा मडाण” मध्ये देखील तसेच प्रमाण देतात कि कलियुगाचा 5000 वर्ष भोग संपल्यानंतर भगवान विष्णू चौषष्ट कलांसोबत पृथ्वी वर मानवस्वरूपात कल्कि अवतार घेतील आणि संपूर्ण विश्वावर राज्य करतील.
" जे सुबाहु जुग कलि, क्षिण आयुष महाबली। पापे सकल क्षय जिब, पांच सहस्र भोग हेब।" (आदि संहिता- अच्युतानंद)
महापुरुष अच्युतानंदजी आपल्या 'आदि संहिता' ग्रंथात लिहितात कि कलियुगाची आयु 4,32,000 वर्षे इतकी आहे परंतु मनुष्याद्वारे पाप कर्मांमुळे संपूर्ण युगाची आयु क्षय (कमी) होऊन फक्त 5000 वर्षे भोगकाळ असेल.               पंचसखांद्वारा लिखित मालिका ग्रंथात हेच प्रमाण मिळते कि कलियुगाची एकूण आयु 4,32,000 वर्ष होती परंतु मानवकृत पापकर्मांमुळे कलियुगाचा क्षय होऊन फक्त 5000 वर्षांचा भोगकाळ असेल. संगम युगात प्रभू कल्कि भगवान मनुष्यरूप घेऊन धरावतारण करतील. म्हणून आपणास हे समजते की महाप्रभू जगन्नाथ स्वयं कल्की अवतार धारण करून पृथ्वीवर अवतरीत झाले आहेत.   जय श्री सत्य अनंत माधव