भविष्य मालिका ग्रंथाचे जनक कोण आहेत?   सत्य, त्रेता, द्वापर आणि कलियुग या चार युगांमध्ये प्रभुंचे पंचसखा या पृथ्वीवर जन्म घेतात. युगाच्या शेवटी, पंचसखा भगवान विष्णूंना धर्म स्थापनेच्या कार्यात मदत करतात. युगकर्म संपवून, भगवान विष्णू प्रत्यावर्तन (परत) गोलोक वैकुंठाला जातात. पंचसखांचा जन्म भगवंताच्या अंशातूनच होतो. हे पंचसखा प्रत्येक युगात वेगवेगळ्या स्वरूपात अवतरीत होत असतात. भविष्य मालिका ग्रंथ आणि पुराणांमध्ये असे आढळते की, सत्ययुगात या पंचसखांची नावे होती:- 1.नारद 2.मार्कंड, 3.गार्गव, 4.स्वयंभू आणि  5.कृपाजल   सत्ययुगाच्या शेवटी, आपापले कार्य संपवून, हे पंचसखा पुन्हा गोलोक वैकुंठाला प्रत्यावर्तन (परत) झाले.   पुन्हा त्रेतायुगाच्या शेवटी, धर्म स्थापनेच्या वेळी, प्रभु श्री रामचंद्र जीं सोबत या पंचसखांचा पुनर्जन्म झाला. त्या वेळी त्यांची नावे होती:-  1.नल 2.नील, 3.जामवंत 4.शुषेण आणि  5.हनुमान   हनुमानजींचा जन्म रुद्र अवतार म्हणून झाला असला तरीही, त्यांनी प्रभू श्री रामचंद्र जिंचा पंचसखा बनून धर्म स्थापनेच्या कार्यात मदत केली. तसेच त्रेतायुगात आपापले कार्य संपवून हे पंचसखा गोलोक वैकुंठाला परतले. पुन्हा द्वापर युगात पंचसखांचा जन्म झाला आणि त्यांनी श्री कृष्णांच्या धर्म स्थापनेच्या कार्यात मदत केली. द्वापर युगातील त्या पंचसखांची नावे होती:- 
  • दाम
  • सुदामा
  • सुबल
  • सुबाहू आणि 
  • श्रीबच्छ
  त्यानंतर कलियुग आले आणि कलियुगाच्या समाप्तीच्या सुमारे 500 वर्षे पूर्वी, प्रभूंच्या पंच सखांनी पुन्हा जन्म घेतला. कलियुगातील पंचसखांची नावे अशी:-    1.अच्युतानंद दास 2.अनंत दास 3.यशोवंत दास 4.जगन्नाथ दास आणि  5.बलराम दास   या कलियुगात निराकार ब्रम्ह श्री जगन्नाथजींच्या  निर्देशाने, पंचसखा पृथ्वीवर अवतरले आणि त्यांच्याच निर्देशाने दिव्य भविष्य मालिका ग्रंथाची निर्मिती केली. प्रभु म्हणतात, "जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पापांचे ओझे वाढते, धर्माची हानी होते आणि जेव्हा जेव्हा सर्व लोकांच्या हृदयात दया, क्षमा, स्नेह, प्रेम इत्यादी  ऐवजी हिंसा, द्वेष, क्रोध, वासना, मत्सर इत्यादी वाढते, तेव्हा तेव्हा युगाच्या शेवटी चार ही  युगांतील माझ्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी आणि पृथ्वीवर सत्य, शांती, दया, क्षमा आणि प्रेम स्थापित करून पृथ्वी मातेचे ओझे हलके करण्यासाठी, दुष्टलोकांच्या विनाशासाठी, ऋषीमुनींचे रक्षण करण्यासाठी मी या पृथ्वीवरकल्किअवतार” धारण करेन. मी येण्याआधीच पंचसखा धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी, भविष्य मालिका ग्रंथाची रचना करतील, आणि चार ही युगातील भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना भ्रष्ट मार्गातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी मार्गदर्शन करतील. म्हणूनच अच्युतानंद दास जी लिहितात की –
"हेतु रसाइबा पाईं कि अच्युत साहास्त्र पुराण कले। कलि काल ठारु बलि काल जाएं हक कथा टा लेखिले"
म्हणजेच भक्तांचे सुप्त चैतन्य जागृत करण्यासाठी महापुरुषांनी कलियुगापासून संगमयुगापर्यंत आणि संगमयुगापासून सत्ययुगापर्यंत घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा उल्लेख ‘भविष्य मालिका’ ग्रंथाच्या रूपात  केला आहे. भविष्य मालिका वाचनाने कलियुगातील भक्तांचे चैतन्य जागृत होईल आणि ते प्रभु कल्किंचा  शोध घेतील आणि त्यांना शरण जातील. महाप्रभू अनादी आदिकंद हरी, जगन्नाथजींनी महापुरुष अच्युतानंद दासजींना कमळाची माळ दिली आणि सांगितले की ‘ज्या ठिकाणी या माळाची सर्व फुले तुटून विखुरली असतील, ते स्थान तुमचे साधनापीठ असेल’. भगवान जगन्नाथजींच्या निर्देशानुसार, पवित्र श्रीक्षेत्र सोडून अनेक मार्गांनी चालत जेव्हा ओडीसाच्या केंद्रपाडा  जिल्ह्यातील ‘नेमाल’ येथील चित्रोत्पला नदीच्या तीरावर असलेल्या एका पवित्र ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्या ठिकाणी शेवटचे फूल तुटले आणि ते पडले. धर्मग्रंथानुसार सत्ययुगात समुद्रमंथनातून निघालेले कमळाचे फूलही त्याच ठिकाणी पडले होते, त्यामुळे या स्थानाला "पद्मवन" असेही म्हणतात. महापुरुष अच्युतानंद दासजींनी त्याच ठिकाणी अध्यात्म साधना सुरू केली. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या चार युगांतील भक्तांच्या उद्धारासाठी लाखो शास्त्रे  एकाच ठिकाणी ध्यान करून रचली. तेच स्थान नंतर लोकांसमोर महापुरुष अच्युतानंद दासजींचे सिद्ध स्थान म्हणून उदयास आले. भगवंताच्या चरण कमळांचे ध्यान करत असताना अच्युतानंद दासजींनी त्याच सिद्धस्थळाविषयी लिहिले आहे –
"श्री अच्युत दास नेमाले निवास पद्म बने तांक स्थिति प्रभु न्क आज्ञा रु अनुभव करि लक्षे ग्रंथ लेखिछंति। छतिस संहिता बास्तरि गीता वंशानु सप्त बिन्स रे, उपवंशानु द्वादस खंड बेनी भविष्य सप्त खंड रे"
अर्थात - महापुरुष अच्युतानंदजींनी त्या पवित्र स्थानावर ध्यान करून एक लाखाहून अधिक ग्रंथांची रचना केली. त्यापैकी 36 संहिता, 72 गीता, 27 वंशचरित्र, 24 उपवंश चरित्र आणि 100 मालिका ग्रंथांचा समावेश आहे. याशिवाय इतर चार पंच सखा, अनंत दास जी महाराज, यशोबंत दास जी महाराज, जगन्नाथ दास जी महाराज आणि बलराम दास जी महाराज यांनीही अनेक मालिका ग्रंथ रचले. एवढी पुस्तके रचूनही पंचसखा लिहितात की ‘आम्ही काहीही लिहिले नाही, महाप्रभूंच्या आज्ञेने विश्व मानवजातीच्या कल्याणासाठी भविष्यमालिका ग्रंथांची रचना झाली आहे. सत्ययुगात तपी, त्रेतायुगात कपी, द्वापर युगात गोपी आणि कलियुगातील भक्त असे चारही युगांचे भक्त या अनंत युगात पुन्हा पृथ्वीवर आले आहेत. पंचसखाद्वारे मालिका ग्रंथाची निर्मिती, भक्तांच्या सुप्त चेतना जागृत करण्यासाठी आणि परमेश्वराच्या लिला मध्ये सामील होण्याची वेळ आली आहे याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी, गोलोक वैकुंठा चे पूर्व संस्कार जागृत करण्यासाठी झाली आहे. भक्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहो, मालिका श्रवण व वाचन केल्यावरच त्यांची पूर्व चेतना जागृत होईल आणि ते प्रभू कल्किंचा शोध घेतील आणि त्यांच्या शरणात जातील. चारही युगातील भक्त येऊन भगवंताच्या चरणकमळांचा आश्रय घेतील आणि अनंत युगात धर्म स्थापनेच्या कार्यात हातभार लावतील. महाप्रभूजींचे संबोधन मिळाल्यानंतर त्यांनी सत्ययुगासाठी दिलेले धोरणात्मक नियम भक्त जगभर पोहोचवतील. भक्त प्रभूजींचे नाम, गुण आणि महिमा जपतील. धर्म स्थापनेच्या कार्यात स्वत:ला लावतील. यासाठी अच्युतानंदजी लिहितात की –
"भकते उदे होइबे, गां गां बुलि मेलि करिबे, रामचन्द्र रे। हरि चरणे भजिबे, रामचन्द्र रे"
म्हणजे भक्त जिथे जातील तिथे एकत्र भजन कीर्तन करतील आणि धर्माचा प्रचार करतील.   पंचसखा परिचय-   1. महापुरुष श्री अच्युतानंद दास जी- अच्युतानंद जी यांचा जन्म 1485 मध्ये ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यातील तिलकणा (ज्याला त्रिपुरा देखील म्हणतात) गावात पिता दिनबंधु खुंटिया आणि माता पद्मावती यांच्या धार्मिक परिवारात झाला. महापुरुष अच्युतानंद दास जी यांनी 1,85,000 ग्रंथ रचले होते आणि एका ज्येष्ठ शुक्ल एकादशीला नेमळ पीठात ध्यानस्थ बसले होते आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या स्व:इच्छेने आपला देह त्याग केला (ते शून्यात अंतर्धान पावले).  त्यांनी रचलेल्या अनेक ग्रंथांमध्ये -  हरिवंश पुराण, गोपालांक ओगल लौडी खेल बारमासी गीता शुन्य संहिता अनाकार ब्रह्म संहिता मणिबंध गीता जुगाब्धी गीता बीजसागर गीता अभेद कबच अष्ट गुज्जरी नब गुज्जरी, शरण पंजर स्तोत्र विप्रवाच्चक, मानमहिमा, असे अनेक ग्रंथ आणि अनेक भजने, पटल, रास, जणाण, चौतिसा (ओडिया भाषेत 34 अक्षरांनी सुरू होणाऱ्या 34 श्लोकांच्या कवितांना चौतिसा म्हणतात), टिका, मालिका इत्यादी सर्वोत्कृष्ट आहेत आणि एकूण लाखो ग्रंथांची रचना केली आहे.   2. महापुरुष श्री शिशु अनंत दास जी - शिशु अनंत दास जी यांचा जन्म 1488 मध्ये ओडीसातील पुरी जिल्ह्यातील भुवनेश्वरजवळील बालीपाटणा  गावात वडील कपिलेंद्र आणि आई गौरा देवी यांच्या धार्मिक परिवारात झाला. त्यांनी अनेक ग्रंथ आणि मालिकाही रचल्या. त्यांच्या ग्रंथांपैकी  हेतू उदय भागवत भक्ती मुक्ति दयाक गीता शिशु बेद टिका शुन्य नाम भेद अर्थ तारेणी उदे बाखराठीक बाखरा, आणि अनेक भजने, चौतीसा, मालिका आदी ग्रंथांची रचना केली.   3. महापुरुष श्री जगन्नाथ दास जी - श्री जगन्नाथ दास जी महाराज यांचा जन्म ओडिशातील पुरी जिल्ह्यातील कपिलेश्वर गावात पिता भगवान दास आणि माता पद्मावती यांच्या धार्मिक परिवारात झाला. संस्कृत श्रीमद भागवत नंतर त्यांनी प्रथम श्रीमद भागवत महापुराणाचे भाषांतर ओडिया भाषेत केले. त्यानंतर त्यांनी अनेक  शास्त्रे आणि भविष्य मालिका ग्रंथांची रचना केली. अनेक ग्रंथांमध्ये त्यांनी पुढील प्रमुख ग्रंथांची रचना केली-  शोल चौपदी चारी चौपदी तुलाभिणा दारू ब्रह्म गीता दीक्षा संवाद अर्थ कोइली मृगुणी स्तुती गुप्त भागवत अनामय कुंडली श्री कृष्ण कल्पलता नित्य गुप्त चिंतामणी नीलाद्री बिलास कलि मालिका  इंद्र मलिका ग्रन्थ   इ. प्रमुख आहेत. त्यांच्या शास्त्र ज्ञान आणि भक्तीमुळे मोहित होऊन श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना ' अतिबडि ' या उपाधीने विभूषित केले होते.   4. महापुरुष श्री बलराम दास जी  महापुरुष बलराम दास जी यांचा जन्म पिता शोमनाथ महापात्रा आणि माता महामाया देवी यांच्या धार्मिक परिवारात 1470 मध्ये (काही ठिकाणी 1482 असा उल्लेख आढळतो) ओडिशातील पुरी जिल्ह्यातील चंद्रपूर गावात झाला.  अनेक शास्त्रांमध्ये पुढील त्यांच्या काही प्रमुख रचना आहेत-  दाढ्यता भक्ती दांडी रामायण, ब्रम्हांड  भूगोल बउला गाई गीत कमल लोचन चौतीसा कांत कोइली लक्ष्मी पुराण बेढा परिक्रमा   सप्तांग योगसार टिका ब्रज कबच ज्ञान चुडामणी (गद्य), ब्रह्म टिका (गद्य) इत्यादी अनेक धर्मग्रंथ आणि मालिका ग्रंथही रचले.  पुरी जिल्ह्यातील समगरा पाट नावाच्या ठिकाणी त्यांनी आपला देह त्याग केला.            5.महापुरुष श्री यशोवंत दास जी- महापुरुष यशोवंत दास जी यांचा जन्म 1482 मध्ये ओडिशातील कटक जिल्ह्यातील अढंग जवळील नंदी गावात वडील बलभद्र मल्ल आणि आई रेखा देवी यांच्या धार्मिक परिवारात (काही ठिकाणी 1486 असा उल्लेख आढळतो) झाला. यशोवंत दास यांनी प्रामुख्याने पुढील ग्रंथांची रचना केली. चौरासी आज्ञा ,  शिव सरोदय षष्ठीमला प्रेमभक्ती , ब्रह्मगीता टिका गोविंद चंद्र (बंगाल पासुन आसाम ते उत्तर भारतातील अनेक प्रांतात करुणा रसांनी भरलेली मधुर आणि रसाळ असल्याने ही कविता प्रसिद्ध आहे) तसेच त्यांनी अनेक शास्त्र आणि मालिका ग्रंथांची रचना केली. मार्गशीष शुक्ल पक्ष षष्ठीला (ओढाणी षष्ठी) त्यांनी देह त्याग केला.   असे हे पंचसखा आध्यत्मिक तत्वज्ञानाने संपन्न होते. हे सर्वजण नेहमी निर्गुण निराकार ईश्वराच्या सुक्ष्म संपर्कात राहत असत. त्यांनी निर्गुण शक्तीच्या आदेशानुसार भविष्याबाबत जे-जे मार्गदर्शन मिळाले त्या प्रमाणे सर्व ग्रंथ आणि मालिकांची रचना केली. फक्त माध्यम बनून त्यांनी ईश्वर वाणी ग्रंथाद्वारे आपल्या पर्यंत पोहोचवली याबाबत ब्रह्म गोपाल महाज्ञाता अच्युतानंद जी उल्लेख करतात कि – 
"आगम भाव जाणे यशोबंत गारकटा जंत्र जाणे अनंत आगत नागत अच्युत जाणे बलराम दास तत्व बखाणे भक्ति भाव जाणे जगन्नाथ पंचसखा ओडिशा महन्त। म्लेच्छ पतित उद्धारिबा पाईं जनम लभिले ओडिशा भुईं।"
*वरील ओळींचा अर्थ असा की पंचसखांपैकी  श्री यशोवन्त दास जी महाराज आगम निगम संबंधी सर्व ज्ञान समजवण्यात समर्थ  होते.  *महान पुरुष शिशु अनंत दास जी महाराज हे सांकेतिक गणिताच्या माध्यमानुसार भविष्य वर्तवण्यात पारंगत होते.  *महापुरुष अच्युतानंद दासजी महाराज हे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अश्या सर्व काळांच्या  तत्वज्ञानात संपन्न होते.  *महापुरुष बलरामदासजी महाराज शास्त्र आणि ब्रह्मांड तत्वज्ञानात  संपन्न होते . * महापुरुष जगन्नाथ दासजी महाराज यांना अष्टदशा पुराणातील भक्ती तत्वाचे ज्ञान सर्वात अधिक होते.                पंचसखांनी प्रभू श्री जगन्नाथ आणि निराकार शक्तीच्या निर्देशानुसार  “भविष्यमालिका“ ग्रंथांच्या माध्यमातून भविष्यवाणी केली त्यात प्रामुख्याने भक्तांचा उद्धार, भक्त आणि प्रभू श्री हरी यांचे मिलन,पापी आणि दुराचारी लोकांचा विनाश आणि दिव्य सत्य युगाचा आरंभ यासंबंधी उल्लेख आहे. पंचासखाद्वारे रचित सर्व ग्रंथ मनुष्य समाजा साठी संजिवनी आहे.   संपूर्ण ब्रह्मांडात  विनाशाचा काळ आता जवळ आला आहे आणि अश्या संगम युगात भविष्यमालिका चे अनुसरण करून महाप्रभूंचे नामस्मरण आणि शरणागती याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही.   जय श्री सत्य अनंत माधव