“संबल ग्राम मुख्यस्य ब्राह्मन्यस्य महात्मन । भबने विष्णु जशश्य कल्कि प्रादुर्भाबिश्यती ।।”वरील श्लोकाचा अर्थ असा आहे की, भगवान विष्णूची महिमा रोज गात असलेल्या संबळ गावातील प्रमुख ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की जन्म घेतील. नंतर जेव्हा भगवान वेद व्यासांनी द्वापार युगाच्या शेवटी महाभारताची रचना केली तेव्हा महाभारताच्या "वनपर्व" मध्ये, भगवान कल्कि यांचा जन्म "संभूत संबळ" गावात होईल असे वर्णन आहे. येथे प्रथम संबळ गाव आणि नंतर "संभूत संबळ" गावाचा उल्लेख असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत.
“कल्कि विष्णु जशानाम द्विज काल प्रचोदिता उप्तसयते महाबिरजेया महाबुद्धि पराक्रम संभूत संबलग्रामे ब्राह्मण बसति सुभे ||”वरील श्लोकात भगवान वेदव्यासजींनी भगवान कल्कि अवताराच्या जन्मस्थान, ज्या ठिकाणी वैष्णव ब्राह्मणांची नवीन वस्ती बसवली गेली होती अश्या संबल गाव किंवा संभूत (नवीन बसलेली वस्ती अथवा गाव) संबळ गाव बद्दल स्पष्ट उल्लेख केला आहे. भारत देशातील उत्तर प्रदेश राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यात संबळ नावाचे एक गाव आहे. तसेच, ओडिशा राज्यातील जाजपूर जिल्ह्यात जिथे माता बिरजा देवी स्वतः विराजमान आहेत आणि बिरजा देवीमंदिराच्या पूर्वेकडील ब्राह्मण गावाचे वर्णन पंच सखांनी” संबळ ग्राम “असे केले आहे. भगवान वेदव्यास महाभारतातील "वनपर्व" मध्ये याचे वर्णन करतात: "जिथे यज्ञ करण्याच्या उद्देशाने ब्राह्मणांचे गाव वसले होते, त्याच गावात प्रमुख ब्राह्मणाच्या घरी, जे भगवान विष्णूंची स्तुती करीत असतील, तेथे भगवान कल्कि जन्म घेतील." ओडिशाच्या इतिहासानुसार, सोम वंशी घराण्यातील राजा " जजाती केशरी" यांनी उत्तर प्रदेशातील कन्नौज येथून 10,000 ब्राह्मण आणले आणि त्यांना माता बिरजा देवी मंदीराच्या पुर्वेकडील भागात त्यांना स्थायीक केले आणि त्याच उच्च कुळात जन्मलेल्या ब्राम्हणांद्वारा दशाश्वमेध यज्ञ करवून घेतला . यावरून आपल्याला एक स्पष्ट पुरावा मिळतो की भगवान कल्की जुन्या संबळ गावात नव्हे तर नवीन संबळ किंवा संभूत संबळ ग्राम येथे जन्म घेतील जे ओडीसा राज्यात स्थित आहे. याचे स्पष्ट प्रमाण आपल्याला भविष्य मलिका या ग्रंथातील महापुरुष अच्युतानंद दासजी यांनी रचलेल्या "बिरजा महात्म्य" या ग्रंथाच्या दुसर्या स्कंधामध्ये मिळते. श्री वेदव्यास यांच्या वाणीला समर्थन देताना, हे सिद्ध झाले आहे की ओडिशातील जाजपूर गावात माता बिरजा देवीच्या मंदिराच्या पूर्व भागात स्थापित ब्राह्मणांची वस्ती हे स्थानच संबळ गाव आहे हे सिद्ध होते. पुढील पंक्तीत याचे वर्णन केले आहे-(श्री व्यासदेव यांनी रचलेल्या संस्कृत महाभारतातील "वनपर्व" मधून घेतलेले)
“सुनबारसुत, निहारबचनाए, अटेअच्युतठार, नाभिगयातीर्थ, हरिहरक्षेत्र, ग्रामटीसंबलपुर”।जय श्री सत्य अनंत माधव



