Author: aaturharsh

В соответствии с циклом временных эпох, первая – Сатйуга, вторая – Третаяуга, третья – Двапараяуга и, наконец, наступает Калиюга. В настоящее время завершается полный период Калиюги, и идет время перехода в новую эпоху, называемую Югасандхья или переходным периодом между двумя эпохами. Согласно Ману-смрити, продолжительность Калиюги составляет 432,000 лет. Однако из-за совершения человеком многочисленных греховных поступков она сократится до 427,200 лет, и лишь 4,800 лет останется для существования Калиюги. Это описано в следующих стихах из Ману-смрити, подтверждающих этот факт: “Четыре тысячи арьяджагу, сотворивших век, Таковы его сотые вечерние и вечерние части.” Значение приведенного выше стиха из Ману-смрити такое: после четырех тысяч…

Read More

चारही युगातील भक्त एकच आहेत महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये… = कलियुगाच्या शेवटी होण्याऱ्या भगवान श्री विष्णूंच्या अवताराची माहिती सर्वांनाच असणार नाही. भविष्य मलिका ग्रंथावर विश्वास ठेवणारे आणि त्याचे पालन करणार्‍या सनातन भक्तांनाच हे अवतार स्वरूप कळेल. श्री अच्युतानंद दास मालिकेत पुढे लिहितात… “कृष्ण भाबरस नोहे वेदाभ्यास पूर्व जार भाग्य थिबा।” अर्थात –  जे पूर्व जन्मापासून भगवंताचे भक्त आहेत आणि ज्यांचे हृदय भगवान श्री कृष्णांच्याप्रती प्रेम आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले आहे, त्यांनाच मानव रूपात आलेल्या श्री कल्कीं चे दर्शन घडेल. शुद्ध भक्तीच्या अभावाने, वेद शास्त्र पारंगत विद्वान, मठाधिपती (महंत),…

Read More

युग स्थित्यंतर आणि श्री कल्की अवतार संकेत  महापुरुष श्री अच्युतानंद दास आणि महापुरुष श्री शिशु अनंत दास  यांच्या भविष्य  मालिकेतील परमेश्वराच्या अवतारा संबंधी काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-   “कली थाउ-थाउ सत्य केहुदिन हेबो केहीण जाणबीर, एणूकरी मोरो अंतना पाईबे नाथीबारु अधिकार।”   अर्थात –  कलियुग ते सत्य युग हे स्थित्यंतर कलियुगाच्या शेवटी असणाऱ्या युग संक्रमणाच्या संधी काळात नकळत होईल. प्रत्येकाला ह्या बदलाची जाणीव असेलच असे नाही. लोकं कलियुग काल गणना आणि त्याच्या समाप्ती संबंधात वृथा वाद विवाद करण्यात व्यस्त असतील. भगवान श्री जगन्नाथ पुढे म्हणतात कि माझे गुप्त अवतार कार्य, माझे धर्म संस्थापना कार्य , आणि माझ्या भक्तांच्या उद्धाराचे…

Read More

पूर्व जन्मीचे भक्त, तपी, कपी आणि गोपीं ना ईश्वर प्रेरणा देतील महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी  लिहिलेली मलिकेची एक दुर्मिळ ओळ… “शेष कली लीला भवतु आगे बुझाई कहिबे  सर्वलो जाइफूलो कल्कि रूप धरिबे माधब।” अर्थात – कलियुगाच्या शेवटी, भगवान महाविष्णू स्वरूप चक्रधर श्री माधव महा प्रभू हे स्वतः भगवान कल्कीं चे रूप धारण करतील. परंतु, मायेच्या प्रभावाने प्रत्येकजण त्यांना ओळखू शकणार नाही. प्रत्येक युगात, जे भक्त परमेश्वराच्या दिव्या लीलां मध्ये त्यांना सदैव साथ देतात व धर्म संस्थापने दरम्यान त्यांना सहाय्य करतात ( जसे कि तपी म्हणजे ऋषी मुनी, कपी म्हणजे वानर आणि गोपी म्हणजे गोप गोपाळ म्हणून…

Read More

श्री केशव लक्ष्मी ह्यांची दिव्य वस्त्रे आणि आभूषणे महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या भविष्य मलिकेच्या दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- भविष्य मालिकेत, श्री केशव लक्ष्मी ह्या उभयतांच्या दिव्य आणि पवित्र अलंकारांचे वर्णन करण्यात आलेले आहे. येण्याऱ्या सत्य युगात भक्तांच्या साक्षीने होण्याऱ्या विविध दैवी लीलांसाठी, द्वापार युगा पासूनच भगवान श्री कृष्णांनी गुप्तपणे दिव्य वस्त्रे व अनेक दिव्यअलंकार पवित्र व सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. “लख्मी नारायण श्रीअंग भूषण ग्रहण ग्रंथ सहिते, बिरजा खेत्ररे स्थापन गुपत तुम्भे देखीबे सख्याते।” अर्थात – द्वापार युगापासून भगवंतांनी जतन केलेली हिच ती दिव्य वस्त्रें आणि दिव्यअलंकार प्रत्येक युगात, विशेष प्रसंगी माता…

Read More

एक कोटी जनसंख्ये मध्ये फक्त एकच भक्त असेल थोर पुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- कलियुगाच्या शेवटी भक्त मंडळी भगवंताला कसे जाणणार ? भक्तांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर श्री अच्युतानंद दास मलिकाद्वारे देतात… संसार मध्यरे केमन्त जानिबी नरअंगे देहबही। गता गत जे जुगरे मिलन समस्तंक जणको नाही।। मानवी शरीराच्या मर्यादे मुळे मनुष्यास जगत्पती श्री विष्णूंना ओळखता येणे अति कठीण आहे. त्यामुळे भक्ताला आलेल्या व्यक्तीशः अनुभवाच्या आधारेच श्री जगन्नाथास जाणणे शक्य असेल. या विषयावर महापुरुष श्री अच्युतानंद दास मालिकेमध्ये लिहितात… अनुभवे ज्ञान प्रकाश होइबो अनुभव करमह। भविष्य विचार तेणकी कहिबी ज्ञाने…

Read More

कलियुग समाप्ती आणि प्रलय पूर्व प्रतिकूल हवामान महापुरुष श्री बलराम दास ह्यांनी लिहिलेल्या मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्य- धार्मिक ग्रंथांनुसार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पाण्याचे निसर्ग चक्र अनियमित असेल. अयोग्य वेळी, अयोग्य प्रमाणात पाऊस पाणी होईल. मनुष्यांस अति तीव्र पावसाचा सामना करावा लागेल ज्यामुळे लोकांना रोग, दुष्काळ, उपासमारीस मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागेल. “अदिने बर्षा हेबो काल नदी बढिबो, अपालकों होई नासजिबे महि अज्ञानी होईबे जन। इंद्र जे अन्याय करिबो जल जे कठोर होइबो, बहुत प्रमाद पड़ीबो केही काहू के ना मानिबे।” अर्थात – अवकाळी मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढेल, नद्यांना प्रचंड पूर येतील, त्यात…

Read More

दश दिशांहून व हिमालय क्षेत्रातून तपस्वी मुनी आणि ऋषी गण दर्शनाच्या उत्कट ओढीने श्री कल्कीं  कडे येतील. महामुनी कपिल आणि महापुरुष अच्युतानंद दास ह्यांनी  लिहिलेल्या कपिल संहिता आणि मलिका यांच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- “बलराम हेबे राजा कान्हु परिचार, बसिब सुधर्मा सभा जाजनग्र ठार, वीणा बाहीन नारद मिलिबे छामुरे, वेद पढुथुबे ब्रह्मा अच्युत आगूरे।” अर्थात – जेव्हा सुधर्मा महासभा भरेल तेव्हा महामुनी नारद वीणा वादन सहित दिव्य गान करतील . प्रत्यक्ष ब्रह्मदेव वेदांचे पठण करतील आणि इंद्र देव सर्व देवतां बरोबर ह्या महा सभेस उपस्थित असतील. त्या दिव्य संमेलनात जगाचे स्वामी श्री हरी, हे बलराम स्वरूपात…

Read More

काही भक्तांनाच श्री कल्कीं चे दुर्लभ दर्शन होईल. महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या भविष्य मलिकेच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये- “कहु अछिहेतु करी सुण सुज्ञ जने, कलीरे कलंकी रूप हेबे भगवान, कपटरे करूछन्ति लीला एसँसारे कपटरे।” अर्थात – पंच सखांनी हि भविष्य मलिका ही कोण्या भक्ती विरहित साधारण विचारसरणी ने सामान्य जीवन जगणाऱ्या मनुष्य वर्गा साठी निर्माण केलेली नाही, तर जे पुण्यवान असे पवित्र, निस्सीम भगवंताचे भक्त आहेत अशांच्या पूर्वजन्मातील संस्काराचे स्मरण राहण्यासाठी आणि तसेच कलियुग सरते समयी भक्तांना भगवान कल्कीं चा अवताराचे ज्ञान होण्यासाठी भविष्य मलिकैची रचना केली गेलेली आहे. महापुरुष पुन्हा एकदा म्हणतात……

Read More

ज्ञान मार्गी लोकं जास्त संशयी आणि भ्रमित असतील. महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेली ओळ- “घोर कलीकाल थोयो ना रहिबो ज्ञानी हेबे जान बाट बडां, मंगो मंगुवालो बोलो ना मनिबे ज्ञान कही अकलणा।” अर्थात – ईश्वराचे अस्तित्व जाणण्यासाठी ज्ञान मार्गच अवलंबणारे ज्ञानी लोकं सर्वात जास्त संशयी आणि भ्रमित होतील. आणि अशी लोकं त्यांच्या तुटपुंज्या विज्ञान व तर्क पद्धतीने ईश्वराप्रत पोहोचण्याचा आणि त्यास जाणण्याचा प्रयत्न करण्यात मग्न असतील. श्रद्धा, भक्ती, दृढ विश्वास आणि भगवंता वरील निस्सीम प्रेम ह्या द्वारे ईश्वर प्राप्ती चा जो सर्वात सोपा मार्ग आहे तो त्यांना उमगणार नाही. जय जगन्नाथ

Read More