दश दिशांहून व हिमालय क्षेत्रातून तपस्वी मुनी आणि ऋषी गण दर्शनाच्या उत्कट ओढीने श्री कल्कीं कडे येतील.
महामुनी कपिल आणि महापुरुष अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या कपिल संहिता आणि मलिका यांच्या काही दुर्मिळ ओळी आणि तथ्ये–
“बलराम हेबे राजा कान्हु परिचार, बसिब सुधर्मा सभा जाजनग्र ठार, वीणा बाहीन नारद मिलिबे छामुरे, वेद पढुथुबे ब्रह्मा अच्युत आगूरे।“
अर्थात –
जेव्हा सुधर्मा महासभा भरेल तेव्हा महामुनी नारद वीणा वादन सहित दिव्य गान करतील . प्रत्यक्ष ब्रह्मदेव वेदांचे पठण करतील आणि इंद्र देव सर्व देवतां बरोबर ह्या महा सभेस उपस्थित असतील. त्या दिव्य संमेलनात जगाचे स्वामी श्री हरी, हे बलराम स्वरूपात स्वतः ला त्या सभेचे यजमान आणि संपूर्ण जगाचा अधिपती म्हणून सादर होतील. हि अभूतपर्व सभा व हा प्रसंग दुर्लभ आणि डोळ्यांचा पारणं फेडणारा असेल. हि सुधर्मा सभा ओरिसा राज्यातील आदिशक्ती बिरजा मातेचा निवास असलेल्या अति पवित्र जाजपुर नगरात होणार आहे.
महापुरुष श्री अच्युतानंद पुढे मालिकेत येथील पवित्र बिरजा क्षेत्राबद्दल लिहितात…
“उत्तररू सन्यासी जे माड़ीन आसिबे, जाजनग्र घेरिजिबे सर्वे देखुथिबे।“
अर्थात –
संपूर्ण विश्वातील दश दिशांहून व हिमालय क्षेत्रातून तपस्वी मुनी आणि ऋषी गण भगवंताच्या दर्शनाच्या उत्कट ओढीने श्री कल्कीं चा शोध घेत घेत ह्या अति पवित्र जाजनगर ला येऊन नगराला चारही बाजूंनी घेरतील. येत्या काळात सर्व भक्तांना परमेश्वराची ही विस्मयचकित करणारी दैवी लीला उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.
कपिल मुनी कपिल संहितेत लिहितात…
“देशान्त प्रथम खेत्रम पार्वती खेत्रे वचः , बिरजावां महादेवी पार्वती ब्रह्मारूपिणी, भक्तानं हितार्थथायः उत्कले भूमिस्थांतहितः, भक्तानां हितार्थथायः उत्कले भूमिस्थांतहितः ।“
अर्थात –
भगवंताच्या चोवीस अवतारांपैकी एक महामुनी कपिल यांनी बिरजा क्षेत्राविषयी लिहिलेले आहे. जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर एकही शक्तीपीठ नव्हते, तेव्हा ब्रह्मदेवाने या पवित्र स्थानी आदी शक्ती माता बिरजा देवीस आवाहन आणि अभिषेक करून स्थापित केले. हे बिरजा शक्ती पीठ हे जगातील सर्व शक्ती पीठांपैकी सर्वात ष्रेष्ठ व प्राचीन आहे. हे स्थान माता पार्वती क्षेत्र म्हणून देखील प्रसिद्ध आहे. माता पार्वती ही प्रत्यक्ष योगमाया आहे, तिला ब्रह्मस्वरूपिणी असेही संबोधतात. माता पार्वती आजही माता बिरजा देवी स्वरूपात ह्या जाजपूर क्षेत्री विराजमान आहे. ह्या ठिकाणी येत्या काही वर्षात सुधर्मा महासभा होणार असून, ती एक पवित्र, अद्भुत, आणि दुर्मिळ अशी घटना असेल.
जय जगन्नाथ