भगवान कल्की यांचे जन्म व जन्मस्थान या विषयीचे तथ्य
भगवान व्यासजींनी भगवान कल्कीचा जन्म आणि जन्मस्थान याबद्दल महाभारतात लिहिलेल्या ओळी आणि तथ्य- संभल ग्राम मुख्यष्य ब्राह्मणस्यो महात्मन, भवने विष्णु यशस्य कल्कि प्रादुर्भाविष्यति। अर्थात – संबळ गावातील प्रमुख ब्राह्मणाच्या घरी भ…
भगवान व्यासजींनी भगवान कल्कीचा जन्म आणि जन्मस्थान याबद्दल महाभारतात लिहिलेल्या ओळी आणि तथ्य-
संभल ग्राम मुख्यष्य
ब्राह्मणस्यो महात्मन,
भवने विष्णु यशस्य
कल्कि प्रादुर्भाविष्यति।
अर्थात –
संबळ गावातील प्रमुख ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की जन्म घेतील, म्हणजेच भगवान विष्णूंचा गौरव करणाऱ्या अत्यंत धर्मनिष्ठ ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की जन्म घेतील. सध्या तरी लोकांच्या मनात असे द्वंद्व हे कि भगवान कल्की विष्णूयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी जन्माला येतील पण तसे नाही. खरे तर आपण सर्वांनी धर्मग्रंथ लिहिलेली वस्तुस्थिती बरोबर समजून घेणे आवश्यक आहे शास्त्र समजून घेतल्यास निदान सापडेल. भक्तीमुळे पवित्रता आणि भगवंताची प्राप्ती होते.
कल्कि विष्णुयशा नाम
द्विज काल प्रचोदीत ,
उत्पत्येसो महा बिरजो
महा बुद्धि पराक्रम।
=अर्थात –
संबळ गावातील एका ब्राह्मणाच्या घरी भगवान विष्णूची स्तुती, किर्तन आणि भजन मनन (पूजा) होते. त्या ब्राह्मणाच्या घरी भगवान जन्म घेतील. भगवान कल्की महान बुद्धिमत्तेने आणि अष्टकला युक्त महा पराक्रमाने अवतार घेतील.
सम्भूत संभल ग्रामे
ब्रह्मणा बसती सुभे।
अर्थात –
ओरिसा राज्यातील संभूत संभल ग्राम (नाभीगया क्षेत्र) म्हणजेच नवीन संबल जे स्थापित किंवा बांधले गेले आहे ययाती केशरी यांनी उत्तर प्रदेशातील कन्नोज येथून 10000 यज्ञ पूजक ब्राम्हणांना आणले आणि त्यांना त्या पवित्र ठिकाणी स्थायिक केले. त्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी सात वेळा अश्वमेध यज्ञ केला होता. आदी युगाच्या निर्मितीच्या वेळी याच पवित्र स्थानावर ब्रह्मदेवाने ही यज्ञविधी केला होता. त्याच नवीन संबळ गावात भगवान श्रीहरी आपल्या मातेच्या गर्भातून आपल्या योगमायेने निसर्गाला वश करून तेथील मुख्य ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतील.
शास्त्राचा खरा अर्थ शुद्ध भक्तीचा मार्ग अवलंबूनच समजू शकतो, ज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या बळावर या सर्व गोष्टींचा सामना करूनही प्रत्येकाला समजणे शक्य नाही.
जय जगन्नाथ

