श्री केशव लक्ष्मी ह्यांची दिव्य वस्त्रे आणि आभूषणे
महापुरुष श्री अच्युतानंद दास ह्यांनी लिहिलेल्या भविष्य मलिकेच्या दुर्मिळ ओळी आणि तथ्ये-
भविष्य मालिकेत, श्री केशव लक्ष्मी ह्या उभयतांच्या दिव्य आणि पवित्र अलंकारांचे वर्णन करण्यात आलेले आहे. येण्याऱ्या सत्य युगात भक्तांच्या साक्षीने होण्याऱ्या विविध दैवी लीलांसाठी, द्वापार युगा पासूनच भगवान श्री कृष्णांनी गुप्तपणे दिव्य वस्त्रे व अनेक दिव्यअलंकार पवित्र व सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत.
“लख्मी नारायण श्रीअंग भूषण ग्रहण ग्रंथ सहिते, बिरजा खेत्ररे स्थापन गुपत तुम्भे देखीबे सख्याते।“
अर्थात –
द्वापार युगापासून भगवंतांनी जतन केलेली हिच ती दिव्य वस्त्रें आणि दिव्यअलंकार प्रत्येक युगात, विशेष प्रसंगी माता महालक्ष्मी आणि भगवान श्री हरी परिधान करीत असतात. जाजनगर येथील माता बिरजा च्या पावन भूमीवर जेव्हा सुधर्मा सभा होणार आहे, तेव्हा त्या सभेत भगवान कल्कि देव आणि माता लक्ष्मी हीच दिव्य वस्त्रें परिधान करतील. ह्या सुधर्मा सभेत उपस्थित असण्याऱ्या भाग्यवान भक्तांना ह्या दैवी दम्पतींचे अलौकिक दर्शन प्राप्त होईल.
भगवंत आपल्या दैवी लीलांमध्ये, आपले प्रिय भक्त व सवंगड्यांनाच सामावून घेतात. असे हे पवित्र भक्त प्रत्येक युगात परमेश्वरा सोबत येतात आणि ह्या दैवी लीलांचे साक्षीदार म्हणून आनंदित होतात.
जय जगन्नाथ